Satara Bank :पराभव स्वीकारला, मी शरद पवार,अजित पवार,सुप्रिया ताई यांची माफी मागतो: Shashikant Shinde
Continues below advertisement
stone pelting on NCP satara office : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत एका मताने पराभव झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.
शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार यांना माहिती आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये.
Continues below advertisement