Satara Murder: साताऱ्यात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणारा पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
सातारा (Satara) तालुक्यातील सासवडे गावात एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीच्या निर्घृण हत्येने (Murder) खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल यादव (Rahul Yadav) नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. 'यापूर्वीही एका मुलीच्या मृत्यू प्रकरणात त्याच्यावर संशय होता', अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. पीडित मुलीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून तिची हत्या करण्यात आली आणि हा प्रकार लैंगिक अत्याचारातून (अतिप्रसंग) घडल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला आणि न्यायाच्या मागणीसाठी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणाचा निषेध करत वकील संघटनांनीही आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस सध्या संशयित राहुल यादव याची कसून चौकशी करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement