Mahajan Family War: प्रमोद महाजन देश कसा सांभाळणार? Sarngi Mahajan यांचा सवाल
Continues below advertisement
प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी प्रकाश महाजन यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत, ज्यामुळे महाजन कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 'जे व्यक्ती आपलं घर सांभाळू शकले नाहीत, ते देशाला कसे सांभाळू शकले असते?', असा थेट सवाल सारंगी महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर केला आहे. प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी किंवा ब्लॅकमेलिंगमुळे झाली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ही केवळ मान-अपमानाची लढाई होती आणि परिवारातील काही सदस्यांकडून प्रवीण महाजनांना अपमानास्पद वागणूक मिळत होती, असेही त्या म्हणाल्या. तसेच, 'पंकजा मुंडे राजकारणात बिघडलेली मुलगी आहे', या आपल्या वक्तव्यावर त्या ठाम असून, तो आरोप वैयक्तिक नसून राजकीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाजन आणि मुंडे परिवारात गटबाजी झाली होती आणि त्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा दावा सारंगी महाजन यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement