Diwali Darshan : सप्तश्रृंगी देवीच्या मंदिर दर्शनाची वेळ वाढली, रात्री 12 पर्यंत दर्शन सुरु राहणार

Continues below advertisement
दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर, आद्य शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) दर्शनाच्या वेळेत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 'बावीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत सप्तश्रृंगी देवीचं मंदिर हे दर्शनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत खुलं राहील', अशी माहिती प्रशासनाने दिली. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आला आहे. एरवी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत असलेले मंदिर आता पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. यासोबतच, गडावर जाण्यासाठी असलेली रोपवे ट्रॉलीची (Ropeway Trolley) सुविधा देखील पहाटे पाच ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola