Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरण: आज न्यायालयात काय होणार?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीज जप्तीबाबत झालेल्या युक्तिवादावर न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. संतोष देशमुख यांच्या अत्यंत निर्घृणपणे झालेल्या हत्येप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता चार ऑगस्टला होईल अशी देखील माहिती समोर येत आहे. पुढील तारीख चार ऑगस्टची मिळालेली आहे. त्यामुळे चार ऑगस्टच्या सुनावणीमध्ये नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे असेल. संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी न्यायासाठी खूप मोठा लढा दिला. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्याकडे केस गेली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर सुनावणी पार पडत आहे.