Santosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहिती
Santosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहिती
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी धनंजय मुंडेंवर (dhananjay munde) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पोलीस प्रशासनाने खुनातील आरोपींविरुद्ध मोक्का लावला आहे. पण, खंडणीच्या आरोपीवर मोक्का नसेल तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, पोलिसांकडून आज 7 आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती आहे.