Santosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमक

Continues below advertisement

Santosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमक

वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार, हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा  सवाल. 

सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा, कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा.

- मस्साजोग चे गावकरी करणार सामूहिक आत्मदहन..

उद्या धनंजय देशमुख यांचं टॉवरवर चढून आंदोलन..

तर परवा गावकरी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही आणि खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही आरोपी करावे व त्याच्या विरोधामध्ये मोक्का लावावा या मागणीसाठी गावकरी परवा दिवशी सकाळी दहा वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत..

संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी उद्याच्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी परवा दिवशी सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram