Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

 वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी बीड न्यायालयात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराडचा कसा सहभाग आहे, फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन, सीडीआर तपासायचे आहेत, असा युक्तिवाद करत 10 दिवसांची कोठडी मागितली. तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. अगोदरच 15 दिवस कोठडी दिलेली आहे. आता पु्न्हा कोठडीची गरज नाही. वाल्मिक कराडचा या गुन्ह्यात काहीच संबंध नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला. सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram