Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

बीड मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. याचदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड सरपंचांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, या हत्येच्या आधी सरपंच देशमुख आणि आरोपींमध्ये कोणता वाद झाला? देशमुखांच्या अपहरणानंतर आरोपींनी त्यांना केलेली मारहाण चक्क व्हॉट्सअॅप ग्रुपवर काही जणांनी पाहिली. देशमुख यांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं? पाहूयात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा हा खास रिपोर्ट....बीडच्या मस्साजोग गावच्या संतोष देशमुखांची  ९ डिसेंबरच्या दिवशी अमानुषपणे हत्या करण्यात आली...  पण देशमुखांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरला  तो हत्येच्या तीन दिवस आधी झालेला एक वाद देशमुखांच्या हत्येआधी काय घडलं? ६ डिसेंबरला आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शन घुलेनं तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली ------  यावेळी सरपंच संतोष देशमुख आपल्या साथीदारांसह भांडण सोडवण्यासाठी गेले, पण दोन गटातला वाद आणखी वाढला   घुले आणि देशमुख गटातील वादाचे व्हिडीओ व्हायरल झाले  ---------  ६ डिसेंबरच्या मारहाणीचा राग मनात ठेवून सुदर्शनचा साथीदार प्रतिक घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करण्याचा प्लॅन आखला   ९ डिसेंबरला केज-मांजरसुबा हायवेवर दुपारी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलंदुसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणेनं सुदर्शन घुले आणि साथीदारांना संतोष देशमुखांचं लोकेशन सांगितलं ----- अपहरणानंतर सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आली ------ जयराम चाटेनं व्हाट्सअॅपवरील 'मोकार पंती' ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला आणि मारहाण करताना लाईव्ह दाखवलं ------- १६ ते १९ वयोगटातील चार ते पाच जणांनी काही वेळ हा व्हिडीओ कॉल पाहिला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram