Santosh Bangar vs Ayodhya Pol : संतोष बांगारांचं अजब चॅलेंज; अयोध्यो पोळ म्हणतात..गद्दार दादूड्या!
हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळतंय.. पण आता संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भरचौकात फाशी घेईल, असं चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलंय.... याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे संतोष बांगर यांच्या वक्तव्यांची गाडी मिशीवरून थेट फाशीपर्यंत आलीय.