Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

Continues below advertisement

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, पुढील 5 वर्षासाठी राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार असेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी व्यक्त केला. बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 25 हजार मतांच्या फरकाने माझा विजय होईल, असा विश्वास देखील बांगर यांनी व्यक्त केला.  

सकाळी सात वाजल्यापासून माझा मतदारसंघात रेग्युलर दौरा सुरु झाला आहे. सकाळी नऊ वाजता एक उद्घाटन केलं आहे. 11 वाजता एक उद्घाटन केलं. मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते अपडेट घेऊन येत आहेत की आमच्या मतदारसंघांमध्ये सर्कलमध्ये गावामध्ये जे आकडेवारी आहे त्याबद्दल विचारपुस सुरू असल्याचे बांगर म्हणाले. विरोधकांना दुसरा काही धंदा नव्हता त्यांना माहित होतं की संतोष बांगर सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जात होते माझ्या मुस्लिम समाजाच्या एका मौलांनी संतोष टारफे यांना वापस पाठवले कशासाठी आमच्याकडे आले असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे बांगर म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram