Santosh Bangar Special Report : संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला, विरोधकांचा थेट हल्ला

हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील. आता त्यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला त्यानी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेत भेट दिली, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola