Makar Sankranti | नंदुरबारमध्ये मकरसंक्रातनिमित्त पतंगोत्सवाचा उत्साह | ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सव साजरा केला जातो. सकाळपासूनच नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सवाची धूम पाहण्यास मिळतेय. घराच्या गच्चीवर उंच इमारतींवर डीजे लावून पतंग महोत्सव साजरा केला जातो. विविध रंगाच्या आणि आकाराच्या पतंग आकाशात दिसून येतायत. आकाशात पतंगांची जुगलबंदी पाहायला मिळतेय. पतंगोत्सव साजरा करताना सुरक्षेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. पतंगाच्या घातक मांजामुळे अनेक पक्षी जायबंदी होतात. त्यामुळे पतंगोत्सवाचा उत्साह साजरा करताना पक्षांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
Continues below advertisement