Sanjaykaka Patil Vs Vishal Patil : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणणाऱ्या संजकाकांना उत्तर
Sanjaykaka Patil Vs Vishal Patil : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणणाऱ्या संजकाकांना उत्तर
सांगली लोकसभेच्या निवडणुकीत संजय काका पाटलांनी विशाल पाटलांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच झाली. मतदानानंतर देखील या दोन उमेदवारांच्या मध्ये एकमेकांवरती टीका टिपणीच सत्र सुरूच आहे. दुसरीकडे दोघांनी देखील आपणच विजय होऊ असा दावा केलाय. मात्र हा दावा करत असताना दोघांनीही एकमेकांवरती टीका करण्याची संधी सोडली नाही. यामध्ये दिलदार मित्र आणि दिलदार शत्रू वरून वाकयुद्ध सुरू झालेय. त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकावरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे.
सांगलीमध्ये संजय पाटील आणि विशाल पाटलांकडून आपणच विजयी होण्याचा दावा, विशाल पाटलांकडून मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख.