Sanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणी

Continues below advertisement

 Sanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणी 

हेही वाचा : 

गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी हिंसाचार (Parbhani Violence) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमवारी परभणी दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यानंतर राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी द्वेष पसरवण्यासाठीच परभणीत आले, असे प्रत्युत्तर दिले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बीड आणि परभणी प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे. परभणी, बीडमधल्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळिमा लावला आहे. या घटनांशी संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित लोक तुमच्या मंत्रीमंडळात आहेत, याचे उत्तर देण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram