Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख उल्लेख करत ट्विट केलेला व्हीडिओ संजय शिरसाटांकडून डिलीट
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) केलं. ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे.
Continues below advertisement