Sanjay Shirsat on Exit Poll 2024 : पिसाळलेला कुत्रा कोणालाही चावू शकतो, शिरसाटांचा राऊतांवर जहरी वार

Continues below advertisement

Sanjay Shirsath नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही मु्ख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीदेखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

आज नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना नेते संजय शिरसाट हे नाशिक दौऱ्यावर आले असताना एबीपी माझाशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील फोन केला होता की, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, असे म्हटले आहे. 

उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंनाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर

संजय शिरसाट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं खरं आहे. पण त्यांनी सांगितलं आम्ही एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केलाय. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाही फोन केले त्यांनी उचलले. नंतर देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील फोन केला होता की, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडायला तयार नव्हते. मात्र नंतर अजित पवार यांचा गट आमच्या सोबत आला, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram