Rohit Pawar On Sanjay Shirsat सिडकोचे 5 हजार कोटी रुपये खायला वेळ,पण शेतकऱ्यासाठी नाही - रोहित पवार
Continues below advertisement
संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कन्नड येथील उपोषणकर्ते संदीप सेठी (Sandeep Sethi) यांना रुग्णवाहिकेतून घरी बोलावून उपोषण सोडायला लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, 'हे सर्व अहंकारी झालेले आहे, सिडकोचे पाच हजार कोटी रुपये खायला तुमच्याकडे वेळ, पण आमचा शेतकरी उपोषणाला बसतो, त्याला भेटायला वेळ नाही,' अशा शब्दात शिरसाटांवर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी संदीप सेठी नऊ दिवसांपासून कन्नड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मात्र, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यस्त कार्यक्रमाचे कारण देत उपोषणस्थळी जाण्यास असमर्थता दर्शवली आणि सेठी यांनाच रुग्णवाहिकेतून संभाजीनगरला आपल्या घरी बोलावले. शिरसाट यांनी चर्चेनंतर सेठी यांचे उपोषण सोडवले असले तरी, त्यांच्या या कृतीमुळे ते असंवेदनशील असल्याची टीका होत आहे. दुसरीकडे, उपोषणकर्त्यानेच माझ्या हस्ते उपोषण सोडण्याची विनंती केल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement