Maharashtra Politics:'ज्या बडव्यांमुळे सेना सोडली, राज ठाकरे आता त्यांच्याकडेच जातायत'- संजय शिरसाट

Continues below advertisement
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'बाळासाहेबांच्या आजूबाजूला जे बडवे बसलेले आहेत, त्यांच्यामुळे मी शिवसेना सोडतोय, असं राज ठाकरे म्हणाले होते, पण आज ते त्याच बडव्यांकडे जात आहेत', अशा शब्दांत शिरसाट यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळीकीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी यापुढेही होतच राहणार, या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा धागा पकडत शिरसाट यांनी ही टिप्पणी केली. तुम्हीच एकेकाळी शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींचे गुणगान गायले होते आणि आता तेच तुम्हाला दुश्मन वाटू लागले आहेत, अशी आठवणही शिरसाट यांनी राज ठाकरेंना करून दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola