Sanjay Shirsat : Raj Thackeray - Eknath Shinde यांच्यात युती होणार? संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली. शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिरसाट यांनीही आज त्याला दुजोरा दिला.
Continues below advertisement