Sanjay Shirsat : जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे;ते तिकडे लोटांगण का घालताहेत ?

Continues below advertisement

Sanjay Shirsat : जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे;ते तिकडे लोटांगण का घालताहेत ? 

आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून त्याच पार्श्वभूमीवर बैठका आणि संवाद यात्रांचेही आयोजन केले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीपर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन, शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जाते. आता, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाकडून प्रतिहल्ला केला जात आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपावरही भाष्य केलंय.  

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. त्यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेतील. या तीन दिवसांमध्ये  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च सुनावणी दिल्लीत होत आहे, त्या पार्श्वभूमीवरही ते दिल्ली दरबारी आहेत. मात्र, ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावर आता शिंदे गटाकडून टीका करण्यात आलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram