Sanjay Shirsat on Sanjay Raut : .... तर डम्पिंग ग्राऊंड गाठावं लागेल - शिरसाट

Continues below advertisement

Sanjay Shirsat on Sanjay Raut : .... तर डम्पिंग ग्राऊंड गाठावं लागेल - शिरसाट

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले, त्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या प्रचंड कामाच्या बळावर पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असे दिसत असताना आता मात्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज पत्रकार परिषद आहे. त्यांच्या मनात काही असेल ते मांडतील. एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे आम्हालाही कळत नाही. न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे एक नंबरवर आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले. शांतीत क्रांती ही एकनाथ शिंदेंची खासियत आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदाच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे होते, आहेत आणि राहणार...असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. '

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram