
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
भगवानगडावर गेले धनंजय मुंडे गेले हे चांगला आहे.. हे काही वाईट नाहीये... संतांच्या सानिध्यात जाणं याचा राजकीय संबंध लावणं काही कारण नाहीये. कुणी भगवानगडावर गेलं म्हणून याचा आक्षेप घेणं हे गैर आहे. अंजली - अंजली ताई वर मी जास्त भाष्य करणे योग्य नाही संजय राऊत - भ्रष्टाचारावर बोललं कुणी पाहिजे या लोकांनी? ज्यांनी मुंबईची वाट लावली . ज्यांनी अडीच वर्ष सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले ते आता पुरावे समोर यायला लागले. खिचडी चोरांनी आणि कफन चोरांनी आमच्यावर बोलावं ? हे शक्य नाही, म्हणून यांनी या गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे सरकार जे चालले आहे कोणी असेल कोणत्याही घोटाळ्यात असेल त्याला माफ करणार नाही हे निश्चित आहे. सामंत ऑपरेशन - सगळे सामंत आमच्याबरोबर आहेत उबाठाचे कधी ऑपरेशन करायचं ? याचा विचार सध्या एकनाथ शिंदे करत आहेत. मला वाटतं ते ऑपरेशनची तारीख कधी देतील आम्ही ऑपरेशन थेटर मध्ये सर्व तयारीनिशी बसलो आहोत, मेन डॉक्टरची वाट पाहत आहोत, डॉक्टर शिंदे आले की ऑपरेशन स्टार्ट होईल. सामना नरहरी झिरवाळ - कोण आहे ते सांग ना ? कधी वर्षावरून नजर ठेवायची सवय, यांना लोकांच्या घरांची वाकून पहायची सवय लागली आहे फटीतून यांनी बंद केली पाहिजे, सर्वसामान्यांसाठी दालन उघडे आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी दालन उघडे असून आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला घरीच बस राजकारण करायचं नाही तर आम्हाला मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. नामदेव शास्त्री - याचा सर्व तपास पोलीस करतील, सर्वांचे जज आपण आरोपी आपण पोलीसही आपण असं नसते. पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल, त्याला त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. सर्वांची मागणी आहे हीच धनंजय मुंडे यांची मागणी आहे. त्यांचे म्हणणे आहे जो कोणी दोषी असेल त्याला फाशी द्यायला पाहिजे. म्हणून पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, तपासाच्या आड राजकीय पुढार्यांनी त्यांचं दिले जाणारे वक्तव्य कमी केले पाहिजे, यामुळे पोलिसांच्या तपासात आडकाठी येते तपास भरकटू शकतो. त्यांना त्यांचं काम करू द्या, जेव्हा सर्व निष्पन्न होईल तेव्हा त्याला महत्त्व प्राप्त होईल...