Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती

Continues below advertisement

Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) जोरदार मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.   आज रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिलाय. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram