Sanjay Shirsat : मंत्रीपदावरून महायुतीत वाद? गोगावलेंच्या वक्तव्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Sanjay Shirsat : मंत्रीपदावरून महायुतीत वाद? गोगावलेंच्या वक्तव्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण

 संजय शिरसाट, मुख्य प्रवक्ते शिवसेना मंत्री पदाच्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो हे सत्य आहे. त्यामागे काही कारण होती. ते मी आता सांगू शकत नाही. माझामुळे भरत गोगावले नाराज नाहीत. त्या मागची कारणही वेगळी आहेत. मात्र आम्ही आजही शिंदेसोबतच आहोत.... अजित दादांना युतीतून बाहेर काढण्यामागचा महायुतीचा कोणताही हेतू नाही. ही फक्त माध्यमांमधील चर्चा आहे. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील याची यात्रा हा फक्त स्टंट आहे.  अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली... त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी... ---------------------------  संजय शिरसाट, मुख्य प्रवक्ते शिवसेना (सिडको अध्यक्ष)  अजितदादाला टारगेट केलं जात नाहीये आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहे जेव्हा महायुती होणार तेव्हा त्यांना जागा तर द्याव्याच लागणार ते काय केवळ तुमचं भलं करण्यासाठी नाही आले, त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे तिरंगा यात्रेमधे कुणीही हिंदु माणूस नाही, काँग्रेसची बी टीम म्हणून काम करतंय त्यांना महाराष्ट्रात त्यांचं आस्तित्व दाखवायचं आहे म्हणून सावधतेनं पावलं टाकत त्यांनी रॅली काढली आहे  ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही हा शिंदे साहेबांचा शब्द आहे मात्र ओबसी समाजामधे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचेे लोक करतायत मविआचे लोक पडद्यामागून आपला छुपा अजेंडा चालवतायत  संजय राऊतांना काय अक्कल आहे का, काय बोलतील त्याचं त्यांना काय कळतं का  सिडकोचं अध्यक्षपद कधी मी मागितलं नव्हतं किंवा भरत गोगावलेंनी मागितलं नव्हतं विधानसभा निवडणुकांपुर्वी आम्हाला मंत्रीपद मिळणार हे निश्चितच होतं..आम्हाला शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि भरत लवकरच एसटीचं अध्यक्षपद स्वीकारतील तो कधीच नाराज नव्हता पहिल्या मंत्रीमंडळविस्तारात जर तो मंत्री झाला असता तर तेव्हा मी राजिनामा देणार होतो हे खरं आहे..मात्र आता त्याला अर्थ नाही मात्र शिंदेसाहेबांना हे माहिती होतं म्हणून त्यांनी कुणावरच अन्याय न होऊ देता आम्हला महामंडळं दिली याला आम्ही बोळवण वगैरे समजत नाही कारण आम्ही नाही मिळालं तरी आम्ही शिंदेसाहेबांसोबतच आहोत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram