
Sanjay Shirsat Interview : दोन 'शिवसेना' झाल्या याचं दुःख, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन
Sanjay Shirsat Interview : दोन 'शिवसेना' झाल्या याचं दुःख, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन
शिरसाट-
*आमदारकी जिंकल्यानंतर बाळासाहेबांकडे गेलो निवडून आलेले सगळे समोर बसले होते त्यांनी मला जवळ बोलावलं घट्ट मिठी मारली. हे आठवलं की आजही अंगावर काटा येतो. शिवसेना प्रमुखांनी छातीशी लावलं त्यावेळी कळलं की आता मी जग जिंकले (हे सांगताना शिरसाट भावनिक झाले)*
*दोन शिवसेना झाल्या याचा फार दुःख होतं. मला आजही आवडत नाही.. आजही माझ्या मनाला यातना होतात. कधी उभाटाचे नेते, पदाधिकारी भेटला त्यांच आमचं नातं असंच आहे. तरी मनामध्ये अंतर पडलं आहे . तू त्या पक्षात ही मी ह्या पक्षात हे आवडत नाही.. पण करावं काय. सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाला. ज्यावेळी सत्तेसाठी हे पाऊल उचललं त्याचवेळी वाटलं आपला हा रास ठरलाय.
जर संधी मिळाली तर दोघांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करेन .दोघांचे तार जोडले पाहिजेत दोघांचे तार जुळले तर माझी काही आक्षेप नाही. माझ्याकडून शंभर चुका झाल्या असतील, माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक माफ होऊ शकते. पण ते होईल की नाही हा प्रश्न आहे.
प्रयत्न हा एका साईडने करून चालत नाही.
राज ठाकरे एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न झाले एका कुटुंबातली व्यक्ती एकत्र आले नाहीत आम्हाला एवढं दूर लोटले गेलं आणि त्या गावचे नाहीत त्यांना असं वाटतं की काही दिवसाचे सोपी आहे ते जातील परंतु असा विचार करणार लोक जे असतात ते काही काळानंतर स्वतः संपतात. पण ताकत एकत्र यायला हरकत नाही तो पुढाकार कोण घेईल हे मला माहीत नाही पण कोणी पुढाकार घेतला आणि जर विचाराची एक वाक्यता आली तर त्यात गैर काही नाही. पण एकमेकांना अपमानित करून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते शक्य नाही. पण दोन पावलं मागं जाणं हा त्याचा उपाय असू शकतो.
आदित्य हे करू शकत नाही. जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकतं मॅच व्हायला पाहिजे..
माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की आम्ही एकत्र आले पाहिजे..
अंतर जे वाढत चालला आहे भविष्यात एवढा मोठा होईल की दोन वेगवेगळ्या ठिकाणी जातील
आता जोडायची वेळ आहे . आता अंतर एवढी लांब नाही की जे जोडू शकणार नाही
धर्मवीर सिनेमात अर्धाच डायलॉग आहे पुढे बरंच काही घडलंय जे घडलं ते देखील त्यांनी आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले.
सिनेमातला डायलॉग शंभर टक्के खरा आहे पण तो अर्धा आहे या तनवाणी आहे तोही होता मला बोलावलं गेटच्या बाहेर उभा केला.... हे वर्षा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे खाजगी नाही कोणताही आमदार आला तर त्याला आत मध्ये बोलावलं पाहिजे . त्याला चहापाणी करा आणि नंतर सांगा साहेब आज भेटणार नाही त्या आमदारांना जर तुम्ही बाहेर उभा करत असाल तर त्याच आमदारामुळे तुम्ही वर्षात आहात हे देखील त्यांना म्हटलं.