Sanjay Shirsat on Eknath shinde : गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाट
Sanjay Shirsat on Eknath shinde : गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाट
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Daregaon) आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. परंतु आजारी असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली.
एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काल दिवसभर एकनाथ शिंदे यांनी आराम केला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे ठाण्याला परतणार आहेत. एकनाथ शिंदे दुपारी दरेगावातून हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.