Sanjay Shirsat On Mahayuti: काही लोक आमच्याशी कपट करतात, संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे
Continues below advertisement
महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठं विधान केलं आहे. 'काही लोक आमला छळ कपट करायचा प्रयत्न करतात,' असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला आहे. शिंदे साहेबांचा आदेश महायुती म्हणून लढण्याचा आहे, पण काही जण युती होऊ नये यासाठी प्रयत्न करत असून त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. शिरसाट यांनी कोणाचेही नाव थेट घेतलं नसलं तरी, त्यांचा रोख स्थानिक पातळीवरील भाजप (BJP) किंवा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्यांकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यातील भाजपच्या एका बैठकीचा संदर्भ देत, अशा गोष्टींमुळे महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हणाले. आपल्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, पण जाहीर विधानं करून वाद निर्माण करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement