Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

बात निकलेगी तो दूर तलक जायगी अशी प्रसिद्ध गझल आहे, म्हणजेच जुन्या गोष्टी उकरून काढायला सुरुवात केली तर अनेक जुन्या जखमांवरची खपली निघेल असा याचा अर्थ. अर्थात ही रचना प्रेमाबाबतची असली तरी राजकारणामध्ये सुद्धा ती तंतोतंत लागू होते. सध्या दोन्ही शिवसेनांचे खासदार एकमेकांच्या अशाच जुन्या जखमा उकरून काढताना दिसतात.संजय राऊत राज्यसभेचे आणि नरेश मसके हे लोकसभेचे खासदार आहेत. या दोघांनी एकमेकांवर काय आरोप केलेत, सभागृहात कुठलाही आरोप करताना त्या आरोपाशी संबंधित तपशील ऑथेंटिकेट करावा लागतो. हा नियम सभागृहाबाहेरील राजकीय आखाड्यात नसला तरी वारंवार होणाऱ्या अशा आरोप प्रत्यारोपांच आयुष्य एका दिवसापेक्षा जास्त नसल्याचं अनेकदा दिसतं. त्यामुळे या दोन्ही खासदारांचे हे आरोप ठाकरे आणि शिंदे खरंच गांभीर्याने घेणार का? एकमेकांवर केलेल्या गंभीर आरोपांचे पुरावे हे दोन्ही नेते तितक्याच गांभीराने देणार का आणि हे झालं नाही तर अशा नेत्यांना आणि त्यांच्या वक्तव्यांना जनता किती गांभीर्याने घेणार,या उकराकुरीतून नेमकं काय समोर आलं आणि कोण घायाळ झालं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola