Sanjay Raut PC : सुनील शेळकेंनी धमक्या देऊ नये..आज तुमची सत्ता, उद्या आमची असेल!

नाशिक : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, आता ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षाचे नाशिकमधील प्रभावी आणि जुने नेते म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर बडगुजर यांचं ठाकरे गटातील स्थान डळमळीत झालं. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाने बडगुजर यांची हकालपट्टी केली. यानंतर आता सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आताही हवेतील पतंगबाजी सुरू

माध्यमांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले,लते आमच्या पक्षात नाहीत जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावरती आम्ही का मत व्यक्त करायचे. मी मत व्यक्त करणार नाही. आमच्या पक्षाचे होते. आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं. एवढेच मी सांगू शकतो. त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात, हा विषय आमच्यासाठी संपला. माझ्याकडे कोणतेही नाव नाहीत. कोण कोणत्या पक्षात जात आहे. कोण कोणत्या पक्षात जात नाही. शिवसेना नाशिकमध्ये अत्यंत खंबीर आहे. काही कुठे याचा ज्यांना जायचं होतं ते गेले आणि पक्षातून दूर करायचा होता त्यांना दूर केलं. नावं येत आहेत, नाव येत राहतील, पुढल्या आठवड्यात मी नाशिकमध्ये जाईन तेव्हा मला सत्य कळेल. आताही हवेतील पतंगबाजी सुरू आहे. पक्षाला अडचणी ठरणारे जे माणसं होती, त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं हा लहान विषय आहे. नाशिकमधील शिवसेना आणि सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola