Sanjay Raut : Kirit Somaiya यांना दिलासा, संजय राऊत यांचे सवाल ABP Majha

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर Save INS Vikrant या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आयएनएस विक्रांतच्या पैशांचा अपहार झाला आहे, तसेच या प्रकरणी आरोपी निर्दोष नाहीत, त्यामुळे उगाच वचवच करू नये अशा आक्रमक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) हायकोर्टानं मोठा दिलासा दिला असून. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सोमवार 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देशही किरीट सोमय्यांना दिले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत असे सांगत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. आणखी काय म्हणाले राऊत?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola