Sanjay Raut : Salim Kutta सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यानं आयोजित केली होती, राऊतांचा आरोप

Sanjay Raut : Salim Kutta सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्यानं आयोजित केली होती, राऊतांचा आरोप

नाशिक : सलीम कुत्तासोबतची (Salim Kutta) पार्टी भाजप (BJP)  पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा आरोप शिवसेना (Shiv Sena)  उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केला आहे.  पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे  फोटो दाखवत राऊतांनी हा  आरोप केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा (Chandrashekhar Bawankule)  व्हिडीओ बडगुजर यांनी दिलेला नाही. मकाऊचा व्हिडीओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.  

संजय राऊत म्हणाले, मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई  करण्यात आल्याची शक्यता आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, बावनकुळेंच्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूरवाल्यांना माहिती आहे की तो व्हिडीओ कसा आला  आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola