Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं

Continues below advertisement

Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं 

न्यायमूर्ती चंद्रचूड (D. Y. Chandrachud) हे घटनाबाह्य पद्धतीने काम करत आहेत. तसेच राज्याचे काळजी वाहू सरकार हे देखील घटनाबाह्य आहे. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपली आहे. 26 तारखेला नवीन विधानसभा तसेच नवीन सरकार अस्तित्वात येणं हे घटनेनुसार अत्यावश्यक होतं. मात्र सरकारचे भाडोत्री कायदेपंडि‍त आता काहीही कागद आणून दाखवातील. पण त्या जागी आम्ही असतो तर एव्हाना आम्ही राष्ट्रपती राजवट लावली असती. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती (Mahayuti) आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे.  चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का?  अद्याप कोणीही सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. निकाल लागून आज जवळजवळ दहा दिवस उलटून गेले आहेत. तसं बघायला गेलं तर एवढे बहुमत असताना 24 तासात सरकार स्थापने संदर्भात दावा करायचा होता. मात्र अद्याप कुणीही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण? राज्याचा मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठं बहुमत तरी विधिमंडळाचा नेता यातून हे ठरवू शकले नाही. सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांना देखील अद्याप कोणीही भेटले नाही. असे असताना राज्यपाल हे खुशाल चालू देत आहे. किंबहुना या प्रांताचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगतात आम्ही पाच तारखेला शपथविधी घेऊ, हे सांगायला ते राज्यपाल आहेत का? त्यांना राज्यपालाचे अधिकार दिले आहेत का? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram