Sanjay Raut On Vishal Patil:विशाल पाटलांचं विमान गुजरातमध्ये उतरू नये, विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका

Continues below advertisement

Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटलांचं विमान गुजरातमध्ये उतरू नये, विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका 
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. सांगलीच्या जनतेला बदल हवा आहे, आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या रुपानं आम्ही उत्तम उमेदवार दिला आहे असंही राऊत म्हणाले. दरम्यान, सांगली काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी राऊतांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला राऊतांवर बोलण्याची गरज वाटत नाही असं कदम म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram