Sanjay Raut : 'मुख्यमंत्री फडणवीस कॅबिनेट चालवतायत की गुंडांची टोळी?'
Continues below advertisement
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुंड घायवळला (Ghaywal) दिलेल्या शस्त्र परवान्याच्या (Weapon License) मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'मुख्यमंत्री फडणवीस कॅबिनेट चालवतायत की गुंडांची टोळी?', असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या सूचनेवरूनच घायवळ नावाच्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिल्याचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटल्याचा दावा राऊत यांनी केला. अशा प्रकारे आणखी किती जणांना शस्त्र परवाने वाटले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत हेच नाशिकमध्ये संपर्कप्रमुख असताना गुंडगिरी करत होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिककरांना लुटण्याचे काम केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे, त्यामुळे गुंडगिरीची भाषा राऊत यांना शोभत नाही, असे प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement