Court on Sanjay Raut : ट्विटरविरोधात राऊतांचा खटला, एकाही तारखेला कोर्टात नाही, कोर्टाचे ताशेरे
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं कडक ताशेरे ओढले आहेत. 26 एप्रिल 2021 रोजी राऊतांनी ट्विटरविरोधात खटला दाखल केला होता. मात्र तेव्हापासून संजय राऊत आणि त्यांचे वकील एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. विनाकारण वेळ घेतल्याबद्दल कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढले. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह आणि अपमानकारक मजकूर हटवण्याची मागणी राऊतांनी केली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक सुनावणीस राऊत गैरहजर राहिले. त्यामुळे कोर्टानं त्यांच्या हेतूवर देखील शंका घेतली