Cricket vs Terror: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने रद्द केली तिरंगी मालिका
Continues below advertisement
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पाकिस्तानसोबतची त्रिकोणी मालिका रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. यावरून शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी बीसीसीआय (BCCI) आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'अफगाणिस्तानमध्ये अमित शाह आणि जय शाह नसल्यामुळे, अफगाणिस्तान हा एक रखरखीत राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला,' असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. प्रियंका चतुर्वेदी यांनीही X वर पोस्ट करत, हे राजकारण नसून दहशतवाद असल्याचे म्हटले आहे. 'आशा आहे की श्रीलंका संघही या मालिकेतून माघार घेईल', असे म्हणत त्यांनी २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. अफगाणिस्तानचा हा निर्णय म्हणजे देशाचा सन्मान खेळापेक्षा मोठा असल्याचे उदाहरण असून, बीसीसीआय आणि भारत सरकारने यातून बोध घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तानने हे पाऊल उचलले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement