Sanjay Raut : PM Narendra Modi यांची टीका राज्य सरकारवर ठपका आहे, सरकारच उत्तर देईल

महाराष्ट्र काँग्रेसमुळं देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लोकसभेत बोलताना केला. ऐरवी केंद्र सरकारच्या टीकेवर प्रतिहल्ला करणाऱ्या संजय राऊतांनी यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलंय. मोदींच्या आरोपाला महाराष्ट्र सरकारच उत्तर देईल असं संजय राऊत म्हणालेत.. मोदींच्या टीकेला थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी संजय राऊतांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतल्या काही गोष्टी उकरून काढल्यात. परप्रांतीयांच्या स्थलांतरासाठी मदत करणाऱ्या सोनू सूदला राज्यपाल भवनात कुणी नेलं होतं असा सवाल राऊतांनी विचारलाय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola