sanjay raut : उत्तर प्रदेशात सत्तांतर होणारच, गोव्यात भाजपकडून नोटांचा पाऊस - संजय राऊत:ABP Majha
आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसंदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशात सत्तांतर अटळ आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही जनमत विकू देणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेलेत. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिलंच असे की, भारतीय जनता पक्षही फुटला. काल एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झाटे यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत सुरु असलेलं युद्ध सुरुये, ते पाहावं. प्रश्न नोटांचा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणूकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल, गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू"