Sanjay Raut : Tipu Sultaan बाबत गौरवोद्गार काढणऱ्या राष्ट्रपतींचा राजीनामा घ्या : संजय राऊत
abp majha web team
Updated at:
27 Jan 2022 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Tipu Sultan controversy : मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजप आणि शिवसेना-काँग्रेसमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपकडून या उद्यानाच्या नावावरून मुद्दा तापवला जात असताना आता शिवसेनेनेही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला राजीनामा हवा असेल तर त्यांनी टिपू सुलतानचे गुणगान करणाऱ्या राष्ट्रपतींचा राजीनामा घेणार का, असा सवाल शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप इतिहासाचा ठेकेदार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले.