Sanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. तर राज्याच्या गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात, असे ट्विट केले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केलाय.  

संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. यावर संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेले पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित दिलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला शपथविधीची तारीख जाहीर करतात. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते, हा काय प्रकार सुरू आहे? या ठिकाणी आम्ही असतो आणि इतका उशीर झाला असता तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram