Sanjay Raut | प्रकाश आंबेडकरांनी कायदेभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं : संजय राऊत

 मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं. या आंदोलनावर प्रतिक्रीया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, हे चित्र सकरात्मक आणि चांगलं नसल्याचं माझं मत आहे.' तसेच प्रकाश आंबेडकर हे संयमी नेते आहेत. ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola