Sanjay Raut on Rahul Gandhi : मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल

Sanjay Raut on  Rahul Gandhi : "मोदी-शाहांना आता रोज राहुल गांधींना राम-राम करुनच संसदेत यावं लागेल"

Sanjay Raut : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही सरकारनं आमच्यावर लादली असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तुम्ही उपाध्यक्षपद जर विरोधकांना दिले तर निवडणुकांचा आम्ही फेरविचार करु अशी इंडिया आघाडीची भूमिका होती. पण सुंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पिळही उतरेल असं म्हणत राऊतांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. परंपरेनं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. विरोधी पक्ष हा मोठा आहे. विरोधी पक्षाचा आकडा हा 240 चा असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

राहुल गांधींना राम राम करुनच मोदींना सभागृहात बसावं लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार असेही राऊत म्हणाले. गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली आहे. पण आता ते शक्य होमार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. इतका मोठा विरोधी पक्ष आहे. आता तर राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता म्हणून समोर बसले आहेत. त्यामुळं राहुल गांधींना राम राम करुनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागले असेही राऊत म्हणाले. त्यामुळं आता संसदेच अधिवेशन सुरु असताना मोदींना पळ काढता येणार नाही, कारण समोर आता राहुल गांधी बसलेत असंही राऊत म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola