Sanjay Raut : दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीने काही नेत्यांना सुपारी दिली
Sanjay Raut : दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीने काही नेत्यांना सुपारी दिली
दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं. नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या (MNS) रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले.
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मनसे पक्षाचा थेट उल्लेख टाळला. मात्र, दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन ते तीन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना अहमदशहा अब्दालीने कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली आहे. त्यापैकीच एक सुपारी शनिवारी ठाण्यात वाजवली गेली. मर्दाची अवलाद असाल, तर समोरून हल्ला केला असता. तुम्हाला विनंती आहे की, पुन्हा काळोखात लपुनछपून असे हल्ले करु नका, समोरून हल्ले करा. तुमच्या घरातही आईवडील, मुलबाळं , तुमची पत्नी हे सगळं पाहत असेल. पण अशा घटनांनी आम्हाला फरक पडत नाही. आमचा ठाण्यातील कार्यक्रम उत्तम झाला. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी उत्तमप्रकारे सुरु आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.