Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात युतीच्या चर्चा सुरू असताना, गुंड सचिन घायवळला (Sachin Ghaywal) शस्त्र परवाना दिल्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला निवडून यायचं आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देतो, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय', असं वादग्रस्त विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केलं, ज्यानंतर त्यांनी माफी मागितली. दुसरीकडे, नागपूरमध्ये (Nagpur) सकल ओबीसी समाजाने (OBC Community) महामोर्चा काढून मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर (GR) रद्द करण्याची मागणी केली. या मोर्चावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, 'माझी लाडकी बहीण' (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, नंदुरबारमध्ये e-KYC साठी महिलांना डोंगरावर जावं लागत असल्याचं चित्र आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement