Sanjay Raut Pune News : महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्याने चर्चा

Continues below advertisement

Sanjay Raut Pune News : महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्याने चर्चा

पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश, अपयश यासर्व घडामोडींवर सर्व राजकीय पक्ष चर्चा, बैठका आणि पुन्हा एकदा पक्षबांधणी करत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसत आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती, त्याबाबत आज शिवसेना ठाकरेंच्या पक्षांचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात रोखठोक भाष्य केलं आहे. 

नेमकं काय म्हणालेत संजय राऊत?

पुन्हा एकदा पक्ष बांधणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरू आहेत. महानगरपालिका निवडणूक सरकारच्या मनात आलं लवकर पार पडतील. त्यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. त्यामुळे आता त्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय ते घेतील. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड, पुणे येथील कार्यकर्त्यांचं मनोबल जाणून घ्यावं, यासाठी आज आमच्या दिवसभर बैठका आहेत. विधानसभेचा चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षोंवर्ष आम्ही निवडणूक लढतोय. पण गेल्या दहा वर्षात अशा ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहे. ते गेल्या 70 वर्षात मी पाहिला नाही. तरीही महाराष्ट्रात, देशात लाखोंच्या संख्येने आम्हाला मतदान झालेलं आहे, आम्ही तुम्हाला मतदान केलं मात्र काय झालं माहिती नाही अशी विविध लोकांना शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलं आहे आणि म्हणूनच मग त्या मारकटवाडी सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या, अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. त्या लोकांच्या संतप्त भावना आहेत. त्याचा आम्ही आदर करतो. त्याचा स्वीकार करतो असंही संजय राऊत यांनी पुढे म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram