ABP News

Sanjay Raut PC : निवडणुकांसाठी गुंडाची मदत व्हावी यासाठी अनेक गुंड जामिनावर बाहेर-राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut PC : निवडणुकांसाठी गुंडाची मदत व्हावी यासाठी अनेक गुंड जामिनावर बाहेर  

कल्याण: उल्हासनगर (Ulhasnagar Crime) येथील गोळीबाराला मुख्यमंत्री शिंदे स्वतः जबाबदार आहे. एकनाथ शिंदेंच्या राजवटीत गुंडांची पैदास सुरु आहे.  गोळीबार प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  टीका केली आहे. महाराष्ट्रात शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर असे गुन्हेगारच निर्माण होतील, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले,  महाराष्ट्रात दीड वर्षांपासून माफिया आणि गुंडांचे राज्य सुरु  आहे. झुंडशाही आणि गुंडगिरीतून हे सरकार आले आहे. पैशाचे व्यवहारातून सरकार आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार आहे. गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहे, ते त्राग्याने असं म्हणतात. मनस्तापातून शिंदेंमुळे हा गोळीबार केला. या महाराष्ट्रात शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर असे गुन्हेगारच निर्माण होतील असे आमदाराने निवेदन दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गुंड, गुन्हेगारांच्या टोळ्यांना कसे फोन जातात, हे मी आधी सांगितलं आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुरुंगातून आरोपींना जामिनावर बाहेर काढण्यात येत आहे. मी त्यांची नावं देऊ शकतो. पुण्यात गुंडांच्या टोळ्यांच्या प्रमुखांना बाहेर काढण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram