Sanjay Raut | 'मी WHO बद्दल बोललो, त्याचा आणि आपल्या डाॅक्टरांचा काय संबंध?' : संजय राऊत

मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डाॅक्टरांचा अपमान केला नाही. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात एकादी कोटी निघून गेली त्याचं कौतुक डाॅक्टरांनी केलं पाहिजे. डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी डाॅक्टरांबाबत व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच मार्ड या संघटनांनी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola