Sanjay Raut : 'Ganesh Naik कसलेले पैलवान, शिंदेंसोबतच्या युद्धात तेच जिंकतील - राऊत
Continues below advertisement
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील कथित शीतयुद्धावर भाष्य केले आहे. 'दोघांच्या या शीतयुद्धामध्ये गणेश नाईक यांचा विजय होईल,' असे भाकीत राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी गणेश नाईक यांना 'कसलेले पैलवान' संबोधले आहे आणि म्हटले की त्यांनी पक्ष बदलले असतील पण कधीही संयम सोडला नाही. ठाणे आणि पालघर क्षेत्रातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचे हे वक्तव्य आले आहे. एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तर गणेश नाईक हे राज्याचे वनमंत्री आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement