Sanjay Raut |विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचे अघोरी प्रयोग,पण सरकारची यशस्वी वर्षपूर्ती: संजय राऊत
गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक संकटांचा सामना केला. विरोधकांनी हे सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक अघोरी प्रयोग केले. पण या सगळ्याला पुरुन उरुन एक वर्षाचा कालखंड या सरकारने यशस्वीरित्या पूर्ण केला, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. दिवाळीनिमित्त मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, "आज नरकचतुर्दशी आहे. परंपरेनुसार आज नरकासुराचा वध केला जातो. महाराष्ट्र आणि सरकारसाठी मंगल आणि शुभ दिवस आजपासून सुरु होतोय. पुढील चार वर्ष फक्त महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचं कल्याण अशा पद्धतीने या सरकारचं काम राहिल, असं मला उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून जाणवतं. पुढील चार वर्ष महाराष्ट्र आणि देशाचं काम करु. राज्यातील प्रत्येकाला वाटलं पाहिले हे माझं सरकार आहे, माझे मुख्यमंत्री आहेत."
ऑपरेशन कमळ होणार असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जातं यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. "या राज्यात आता कोणतेही ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन्स करण्याचे प्रयत्न केले. पण सरकारला कुठेही खरचटलं नाही. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशनची भाषा बंद करायला हवी. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुढील चार वर्ष सरकारला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असायला हवी. पुढे निवडणुकीत काय निकाल लागेल तेव्हा बघू काय करायचं."